
सोलापुरातील कापड उद्योगाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन (टीडीएफ)च्या वतीने सोलापूर येथे नुकत्याच भरविण्यात आलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय ‘व्हायब्रंट टेरी टॉवेल ग्लोबल एक्सपो व समिट २०१९’ या प्रदर्शनात २ हजार ४८ लोकांनी टेरी टॉवेलसह मानवी साखळी करून जगातील सर्वात लांब ‘टेरी टॉवेल मानवी साखळी’चा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. यापूर्वी इटलीमध्ये १६४६ लोकांनी अशा प्रकारची मानवी साखळी करून जागतिक पातळीवर विक्रम प्रस्थापित केला होता. तो यानिमित्ताने मोडला गेला. या मानवी साखळीचे आयोजन २७ सप्टेंबर २०१९ रोजी लिंगराज वल्याळ मैदान, वॉलचंद इंजिनिअरिंग कॉलेज मागे, सोलापूर येथे करण्यात आले होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे पत्रक टेरी टॉवेलच्या मानवी साखळीचे आयोजन करणाऱ्या संस्थेला दिले आहे.
Leave a Reply