
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे पाच आमदार आणि दोन खासदार निवडून आले होते. लोकसभेमध्ये दोन्ही शिवसेनेचे खासदार झाल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले अशी प्रतिक्रिया खासदार संजय मंडलिक यांनी दिली होती. तीच प्रचीती विधानसभेला येईल असे वाटत होते. परंतु शिवसेनेचा संपूर्ण जिल्ह्यातून सुपडा साफ झाला. जिल्ह्यात राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर वगळता कोणालाही आपला गड राखता आला नाही. शिवसेनेच्या सर्व आमदारांना पराभव चाखावा लागला. शिवसेनेचा कोल्हापूर जिल्हा हा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु जनतेने भगव्याला कौल न देता यावेळेस हाताला साथ दिल्यामुळे कोणालाच आपला पराभव थांबवता आला नाही. सर्व आमदार पराभूत झाल्यामुळे भगव वादळ शमलं की काय अशी प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहे.
Leave a Reply