
कोल्हापूर / प्रतिनिधी : नुकताच लागलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर या दोन्ही जागा कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. कोल्हापूर दक्षिण मध्ये भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी 44964 मतांनी पराभव केला तर कोल्हापूर उत्तर मध्ये काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा 15 ,199 मतांनी पराभव केला. या कोल्हापूर शहरातील दोन्ही जागा काँग्रेसला मिळाल्यामुळे कोल्हापूर शहर काँग्रेसमय झाल्याचे दिसून आले. विजयानंतर दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी शहरांमधून जल्लोषात मिरवणुका काढल्या.
मतदानाच्या पहिल्या फेरीपासूनच दोन्ही उमेदवारांनी मतांमध्ये आघाडी घेतली होती. ती कायम राखत दोघांनीही विजयाची गुढी उभारली.
कोल्हापूर जिल्ह्यात सतेज उर्फ बंटी पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता.भाजप च्या लाटेत काँग्रेसचे गतवैभव परत एकदा मिळवण्यात जिल्हा अध्यक्ष यशस्वी झाले.
Leave a Reply