
कोल्हापूर : पूरामुळे व शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील बहुतांशी रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे शहरातील मंजूर रस्ते तातडीने करुन घेण्याचे आदेश आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना दिले आहेत. आयुक्त कार्यालयामध्ये आज शहरातील रस्त्याबाबत शहर अभियंता व उपशहर अभियंता, जल अभियंता यांची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.आयुक्तांनी मंजूर रस्त्यांच्या कामावर निरिक्षणासाठी अतिरिक्त आयुक्त व मुख्य लेखापरिक्षक यांची नियुक्ती करण्यात येणार असून दर आठवडयाला कामाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक घेणार असलेचे सांगितले. शहरामध्ये जी कामे यापुर्वी पुर्ण होऊन खराब झालेली आहेत. त्या कामाची डिफेक्ट लाईबिलीटी निश्चित करुन संबंधीत ठेकेदाराकडून रस्ते दुरुस्त करुन घेण्याचे आदेशही उपशहर अभियंता यांनी दिले. तसेच महापालिकेच्यावतीने उर्वरीत पॅचवर्कची कामेही तातडीने सुरु करण्याचे आदेश यावेळी दिले. पाणी पुरवठा विभागाकडून अमृत योजनेअंतर्गत सुरु असलेल्या मंजूर कामांची यादी विभागीय कार्यालयांना या विभागाने द्यावी. तसेच ड्रेनेज अथवा पाण्याच्या पाईपलाईनची पुर्ण झालेल्या कामाच्या ठिकाणी तातडीने डांबरीकरणाचे पॅचवर्क संबंधीत ठेकेदाराकडून करुन घेण्याचे आदेश जल अभियंता यांना दिले. वर्कऑर्डर दिलेल्या ठेकेदारांनी वेळेत कामे सुरु न केलेस त्यांच्यावर कारवाई करा. स्वच्छतेप्रमाणे रस्त्यांच्या कामाचीही मोहिम हाती घेऊन शहर लवकरात लवकर खड्डे मुक्त करुया असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी चालू आर्थिक वर्षातील स्वनिधीतून मंजूर कामे, वर्कऑर्डर झालेली कामे, राज्यस्तरीय नगरोत्थानची कामे, जिल्हास्तरीय नगरोत्थानची कामे, दलितेत्तर मंजूर कामे याबाबत आयुक्तांना सविस्त माहिती दिली. तसेच औद्योगिक वसाहतीसाठी शासनाकडून मंजूर झालेले 4.76 कोटीच्या कामाची वर्कऑर्डर आचारसंहितेमुळे देता आलेले नाहीत. त्या कामांची वर्कऑर्डरी देऊन हि कामेही तातडीने सुरु करणार असलेचे सांगितले.
Leave a Reply