
कोल्हापूर: कोल्हापूरात आलेल्या महापुरामुळे शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, याबाबत शासनाने जाहीर केलेल्या मदतीची अजूनही अंमलबजावणी होत नसल्याने, आज जिल्ह्यातील आघाडीच्या सर्व आमदारांकडून जिल्ह्याधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देऊन सर्व पूरग्रस्तांना योग्य आणि तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी, आमदार पी. एन. पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज (बंटी) डी. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील आदी उपस्थित होते.
Leave a Reply