
डायमंड प्रोड्युसर्स असोसिएशन या जगातील आघाडीच्या डायमंड मायनिंग कंपन्यांच्या जागतिक संघटनेने बदलाला अंतर्भूत करणारी आणि चालना देणारी आंतरराष्ट्रीय लिलाव कंपनी सॅफ्रॉन आर्टसोबत सहयोग जोडला आहे. अस्सल हि-यांना चालना देण्याचे आपले प्रयत्न सुरू ठेवत डीपीए निसर्गाला मानवंदना म्हणून ‘भारतीय ज्वेल्सच्या वारसाला आकार’ या थीमसह द्विवार्षिक आभूषण संमेलन’डायलॉग्ज इन आर्ट’चे आयोजन करत आहे.या झपाट्याने विकसित होत असलेल्या कृत्रिम विश्वामध्ये हिरे उद्योग अग्रस्थानी आहे आणि आजही या उद्योगाचा नैसर्गिकता व वास्तविकतेच्या मुलभूत मूल्यांवर विश्वास आहे. यामुळेच नैसर्गिक हि-याच्या दागिन्यांच्या निर्मितीला चालना मिळत आहे. या विश्वासाशी संलग्न राहत डायमंड प्रोड्युसर्स असोसिएशन उद्योग आणि ग्राहकांना ‘रीअल का महत्त्वाचे आहे’ हा विचारशील संदेश देत आहे. यामुळे विश्वास निर्माण होण्यासह निसर्गवादी भावनेसाठी व्यासपीठ दिले जात आहे.डीपीए इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका रिचा सिंग म्हणाल्या, ”डीपीए आणि सॅफ्रॉन आर्ट या दोघांचा अस्सलतेच्या तत्त्वावर विश्वास आहे. या विचारामधूनच त्यांच्यासोबत भागीदारी करण्यासाठी आम्हाला परिपूर्ण कारण मिळाले. सॅफ्रॉन आर्ट हे विचार व संकल्पनांच्या देवाणघेवाणासाठी नेहमीच एक व्यासपीठ राहिले आहे आणि त्यांची ही विचारधारणा डीपीएच्या रीअल का महत्त्वाचे आहे याबाबत जागरूकता निर्माण करणा-या उपक्रमाशी संलग्न आहे. आमचा उद्देश नैसर्गिक हि-यांचे खरे महत्त्व सादर करण्याचा आहे. हा सहयोग आम्हाला रीअलची दुर्मिळता, वारसा आणि मूल्य माहित असलेल्या मर्मज्ञांसोबत संवाद साधण्यामध्ये मदत करतो. डीपीएमध्ये आमचा हि-यांशी संबंधित सर्व माहिती देणारा निष्पक्ष स्रोत बनण्याचा प्रयत्न आहे. आम्ही या सहयोगाचा लाभ घेत ग्राहकांना नैसर्गिक हि-यांच्या सकारात्मक पैलूंबाबत माहिती देण्याचा मनसुबा ठेवतो.”या आयकॉनिक संमेलनामध्ये जगभरातील कला व दागिने मर्मज्ञ एकाच छताखाली येतील. ते रत्ने, दागिने आणि खासकरून रीअल हि-यांच्या महत्त्वाबाबत चर्चा करतील. सॅफ्रॉन आर्टच्या सहयोगाने डीपीएचा हा उपक्रम नैसर्गिक हि-यांचे दीर्घकालीन महत्त्व,अद्वितीयता आणि योग्यतेसंदर्भात चर्चा निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.
Leave a Reply