पंतप्रधानांच्या हस्ते “ब्रिजिटल नेशन”पुस्तकाचे अनावरण

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “ब्रिजिटल नेशन” पुस्तकाचे अनावरण केले आणि नवी दिल्लीतील ७ लोक कल्याण मार्ग, इथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये श्री रतन  टाटा यांना या पुस्तकाची प्रथम प्रत सादर केली. हे पुस्तक श्री एन चंद्रशेखरन आणि सुश्री रूपा पुरुषोत्तम यांनी लिहिले आहे.यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सकारात्मकता आणि आशीर्वादाने  परिपूर्ण  आणि तंत्रज्ञानाचे महत्व  सांगून सखोल भाष्य करणारे दूरदर्शी पुस्तक लिहिल्याबद्दल लेखकांचे कौतुक केले.तसेच  हे पुस्तक अशा काळात उदयास येत आहे जेव्हा तंत्रज्ञान लाखो भारतीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे असे ही यावेळी ते म्हणालेतंत्रज्ञान हा एक ब्रिज आहे  विभाजक नाही हे समजून घेण्याची गरज असण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. ‘सबका साथ, सबका विकास’ अर्जित करीत असतांना तंत्रज्ञान, आकांक्षा आणि यश, मागणी आणि वितरण, सरकार आणि प्रशासन यांचा ब्रिज बनत असतो. ते म्हणाले कि वेगाने वाढणाऱ्या महत्वाकांक्षी भारतासाठी सकारात्मकता,सर्जनशीलता आणि रचनात्मक मानसिकता अत्यंत आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी हेतू यांच्या मध्ये ब्रिज निर्माण करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!