
कोल्हापूर: 25 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व मुख्याध्यापकांना आवाहन केले.तंबाखू मुक्त शाळा अभियान प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाऊंडेशन, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य विभाग व सहाय्यक सेवाभावी संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असून आजच्या धकाधकीच्या युगात तरुण मुले मुली तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून आपले अनमोल जीवन उद्ध्वस्त करून घेत आहेत. हे तरुण पिढी सुधारली पाहिजे यासाठी तंबाखू मुक्त अभियान राबवून जनजागृती करणे गरजेचे आहे. तंबाखूमुक्त शाळेचे 11 निकष पूर्ण करून सलाम मुंबई फाऊंडेशन च्या टोबॅको फ्री स्कूल या ॲपवर माहिती भरून आपली शाळा तंबाखूमुक्त करण्याचे आहे.यावेळी कार्यक्रम अधिकारी शशिकांत कदम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमचे क्रांती शिंदे, सलाम मुंबई फाऊंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक अजय पिळणकर, जिल्हा समन्वयक संजय ठाणगे, रवी कांबळे, बसवराज कुंभार, शिक्षक एकनाथ कुंभार, सौ.सविता पाटील आदी उपस्थित होते.
Leave a Reply