मनोरंजन आणि सामाजिक प्रश्नांची सांगड असलेला ‘कोती’ ८ नोव्हेंबरला प्रदर्शित

 

कोल्हापूर: अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कारांनी गौरवलेला ओएम आर्ट्स निर्मित ‘कोती’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक महत्त्वाचा सामाजिक विषय या चित्रपटात हाताळण्यात आला असल्याने हा चित्रपट महत्त्वाचा आहे. “कोती” चित्रपटाचा विषय हा तुतीयपंथीयांच्या बालपणीची गोष्ट असलेला आहे.आपल्या भावाला समाज का झिडकारतो या विचारातून त्या विरोधात दुसऱ्या भावाने लढा या आशययसूत्रावर कोती’बेतला आहे. दोन भावंडांतील संवेदनशील नातं हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. काही मोजके अपवाद वगळता मराठी चित्रपटसृष्टीत तृतीयपंथीयांचा विषय हाताळलेला नाही. या पार्श्वभूमीवर, ‘कोती’ महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. अनेक महोत्सवांमध्ये चित्रपटाचा गौरव झाला आहे.इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या (इफ्फी) प्रतिष्ठेच्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात या चित्रपटाची निवड झाली होती. भारत सरकारने कान महोत्सवासाठी या चित्रपटाची प्रवेशिका पाठवली होती. त्याशिवाय दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय महोत्सवात परीक्षक पुरस्कार, संस्कृती कलादर्पण पुरस्कारांमध्ये लक्षवेधी चित्रपटासह चार पुरस्कार, कोल्हापूर महोत्सवात पाच पुरस्कार पटकावले आहेत.आज्ञेश मुडशिंगकर, दिवेश मेदगे, संजय कुलकर्णी, विनीता काळे, मोहिनीराज गटणे यांनी चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ओएम आर्ट्सच्या डॉ. संतोष पोटे व डॉ. सूनीता पोटे यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुहास भोसले यांनी केलं आहे.या चित्रपटानंतर समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल अशी अपेक्षा आहे. अशी भावना दिग्दर्शक सुहास भोसले यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!