
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेबद्दल तू तू मे मे सुरू आहे. आज बारा वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल संपत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार आहेत. परंतु पुढचा मुख्यमंत्री कोण यावर अजून शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत होत नसल्याचे गेली चौदा दिवस महाराष्ट्राची जनता बघत आहे. याच वेळी कार्तिकी एकादशीनिमित्त चंद्रकांतदादा पाटील यांनी विठ्ठलाला साकडे घातले आणि जनता सुखी होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना केली.
Leave a Reply