
कोल्हापूर: सिद्धगिरी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर येथे गेल्या तीन ते चार वर्षात अनेक रुग्णांच्या अपस्मार आजारावरील अतिशय अवघड अश्या स्वरूपाच्या शस्त्राक्रिया “संस्कार” विभागात यशस्वीरीत्या पार पडलेल्या आहेत. आणि अपस्मार आजारावरील शस्त्रक्रिया करून काही रुग्ण फिट्स पासून मुक्तही झालेले आहेत. सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये कार्यरत असणारे सिद्धगिरी अँडव्हान्सड न्युरो सायन्स सेंटर अँन्ड रिसर्च युनिट” ह्या न्युरो विभागामार्फत अपस्मार आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. अशी माहिती संस्कार ह्या न्युरो विभागाचे प्रमुख ‘न्युरोसर्जन’ डॉ.शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. अपस्मार (फेफरे) जगभरात ६५ दशलक्ष लोक अपस्मार ह्या आजाराने ग्रस्त आहेत.अपस्मार हा एक गंभीर आजार आहे, जो लहान मुले असो किंवा वृद्ध,प्रौढ अशा कोणालाही कोणत्याही वयात ह्या आजाराची लक्षणे दिसून येवू शकतात. काही रुग्णांना पुन्हा पुन्हा चक्कर येणे, पडणे, डोके दुखणे, दातखिळी बसणे,तोंडावाटे पांढरा फेस येणे, शरीराची अति प्रमाणात कंपनता, अशाप्रकारची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अशा ह्या अपस्मार आजाराचा रुग्णावर आणि कुटुंबातील सदस्यांवर सुद्धा वाईट परिणाम किंवा आर्थिक,मानसिक आणि सामाजिक अश्या बाबींना सामोरे जावे लागल्याचे आपल्यास निदर्शनास येते. अशा कित्येक अपस्मार आजार असणाऱ्या रुग्णांना सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया व उपचार यशस्वीरीत्या करण्यात आलेले आहेत.यावेळी प पू स्वामीजींनी या बाबत प्रचार व्हावा व रुग्णांना सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अमित हुक्केरीकर यांनी मठाच्या उपक्रमांची माहिती दिली.कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य योजना येथे उपलब्ध असल्याने सीमाभागातील सर्व लोकांना ह्याचा लाभ मिळत आहे.पत्रकार परिषदेस डॉ.प्रकाश भरमगौडर, प्रल्हाद जाधव,विवेक सिद,प्रवीण सुतार आदी उपस्थित होते.
Leave a Reply