
कोल्हापूर : गेले अनेक वर्षे प्रलंबित असणारा आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणारा आयोध्या राम मंदिर जमीन मालकी चा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर करण्यात आला. प्रगल्भ भारताने हा निकाल संयमाने स्वीकारला. देशभरात सर्वत्र या निकालाचे स्वागत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यादृष्टीने शांततेच्या मार्गाने करण्यात आले. हा ऐतिहासिक निकाल आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्तेयांनी जिल्हा कार्यालयात एकत्र येऊन बघितला. निकाल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर उपस्थितांच्या वतीने श्रीरामांची आरती करण्यात आली आणि मान्यवरांच्या हस्ते लाडूचे वितरण करून या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी दिलीप मेत्राणी, सुभाष रामुगडे, आर.डी.पाटील, अॅड.संपतराव पवार, याची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना प.म.देवस्थान समिती अध्यक्ष म्हणाले, भारत देशातील करोडो सर्वसामान्य व्यक्तीच्या भावना या निकालाकडे होत्या. सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट निकाला दिल्याबद्दल अभिनंदन केले. जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, मुळातच श्रीराम हा फक्त हिंदू धर्मीयांचा राजा नसून तो मुलता: भारतीय संस्कृतीचा नायक आहे. त्यामुळे आजचा निकाल हा कोणत्याही धर्मीयांशी नसून भारतीय संस्कृतीचा विजय आहे म्हणून तो जात-धर्म-पंथाच्या पलीकडे जाऊन सर्व धर्मियांनी भारतीय म्हणून व्यक्तिश: साजरा करावा.याप्रसंगी नगरसेवक विजय खाडे, उपाध्यक्ष मारुती भागोजी, गणेश देसाई, सुरेश जरग, नचिकेत भुर्के, सुनिता सूर्यवंशी, भारती जोशी, सुलभा मुजूमदार, गायत्री राऊत, संजय सावंत, सचिन जाधव, डॉ.राजवर्धन, रविंद्र मुतगी, भरत काळे, मनोज इंगळे, नजीर देसाई, तौफिक बागवान, इकबाल हकीम, दिग्विजय कालेकर, विजय आगरवाल, माणिक पाटील, गिरीष साळोखे, विवेक वोरा, सुमित पारखे, प्रसाद मोहिते, पुष्कर श्रीखंडे, मुसाभाई कुलकर्णी, विद्या बनछोडे, विद्या पाटील, कविता पाटील, प्रमोदिनी हर्डीकर, आसावरी जुगदार, शोभा भोसले, शारदा लोहार, विश्वजित पवार, अतुल चव्हाण, देवदास औताडे, संजय जासूद, सुनीलसिंह चव्हाण, किरण कुलकर्णी, महादेव बिरंजे, मानसिंग पाटील, बापू राणे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply