
किरणोत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये किरणे पूर्ण क्षमतेने देवीच्या मुखापर्यंत पोहोचली. त्यामुळे आज किरणोत्सव पूर्ण झाला .आज प्रथम किरणे कठांजनाजवळ ५.४३ मिनिटांनी पोहोचली. त्यानंतर किरणांनी ५.४४ मिनिटांनी चरणांना स्पर्श केला. पुढे ५.४५ मिनिटांनी ही किरणे कंबरेपर्यंत पोहोचली. त्यानंतर ५.४६ मिनिटांनी छातीपर्यंत किरणे पोहोचली. पुढे ५.४७ मिनिटांनी गळ्यापर्यंत ही किरणे पोहोचली. त्यानंतर ५.४८ मिनिटांनी ही सोनेरी किरणे चेहऱ्यावरून मळवटापर्यंत पोहोचली. पुढे ५.४९ला किरीटाकडून
ही किरणे लुप्त झाली. अशा प्रकारे आजचा किरणोत्सव झाला.
Leave a Reply