
कोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेसवक संघाच्या स्वयंसेवकांनी पंचगंगा घाटावर श्रीराम मंदिराची रांगोळीद्वारे प्रतिकृती रेखाटली होती. या वेळी चारही बाजूने दीप प्रज्वलीत करण्यात आले होते. रांगोळीवर ‘जय श्रीराम’ असे लिहिण्यात आले होते. अत्यंत सुंदर अशी रेखाटलेली ही रांगोळी पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले.
याचसमवेत सहस्रो नागरिकांनीही मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पंचगंगा काठावर विविध ठिकाणी पणत्या लावून दीपोत्सव साजरा केला. अनेक संस्था, संघटना, सामान्य नागरिक यांनी स्वतंत्ररित्या पंचगंगा काठावर रांगोळ्या काढल्या होत्या. यात काही प्रबोधन करणार्या, तसेच विविध विषयांवर रांगोळ्या होत्या. गणेशोत्सवानंतर प्रथमच नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने पंचगंगा घाटावर पहायला मिळाले.
Leave a Reply