
कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये पहिल्यांदाच डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ऐतिहासिक पन्हाळगडावर करण्यात आले होते. पर्यटकांचा ओघ वाढावा पन्हाळगडावर वृक्षारोपण व्हावे पुरातत्त्व इमारतींची काळजी घेणे ,पुरातन वास्तू जतन करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ग्रीन रन फॉर हेरिटेज हे घोषवाक्य घेऊन कोल्हापूर मधील डेक्कन स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन ही धा वण्याची स्पर्धा आज आयोजित केली होती.या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
ही हाफ मॅरेथॉन धावण्याची स्पर्धा ५ किलोमीटर ,१० किलोमीटर आणि २१ किलोमीटर अंतरावर पार पडली. यामध्ये एकूण ३५० पेक्षा जास्त स्पर्धकाना सहभाग घेतला होता.यामध्ये महिलांचाही समावेश होता.ही धावण्याची स्पर्धा फोर्ड इंटरनॅशनल पासून,बुधवार पेठ ते बाजीप्रभू देशपांडे पुतळा,पावनगड ,वाघाबिल,पुसाटी बुरुज,तबक उद्यान,सज्जा कोटी ते पुन्हा फोर्ड इंटरनॅशनल आदी मार्गांवर काढण्यात आली.स्पर्धेला सकाळी ६ वाजता सुरुवात झाली .पन्हाळा पोलीस इन्स्पेक्टर श्री.फडतारे, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. करणसिह गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विश्वविजय खानविलकर,जयेशभाई कदम,राजीव लिंगरज यांची उपस्थिती होती.२१ किलोमीटरच्या स्पर्धेत १६ ते ३०,३० ४५ पुढे सर्व वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा फोर्ट इंटरनॅशनल पासून सुरू होऊन ती पावनगड ,वाघाबिळ,सज्जा कोटी मार्गे परत बाजीप्रभू देशपांडे पुतळा अशी झाली.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल देण्यात आले तीनही गटातील स्पर्धकांना टी-शर्ट ,गुडी बॅग व टाईमचिप देण्यात आली होती.स्पर्धेत विजयी स्पर्धकांना पन्हाळा माजी नगराध्यक्ष मोकाशी , डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे उदय पाटील व वैभव बेळगावकर,एक्साईज एसपी गणेश पाटील,संग्राम साळोखे यांच्या उपस्थितीत बक्षिसे देण्यात आली.स्पर्धेतील विजयी स्पर्धक असे आहेत.दहा किलोमीटर 16 ते 30 वयोगट पुरुष कपिल पवार,ओंकार येडगे, आयर्न पंडित मुली -अपूर्वा मेहतर, संस्कृती आयरे, वैदेही जर्डे दहा किलोमीटर 31 ते 45 वयोगटातील पुरुष -किरण पावेकर, करण जाधव, सचिन कदम मुली -आरती संघवी, मनीषा शेळके, अर्चना पाटील दहा किलोमीटर वर पुरुष वयोगट 45 हेमंत कांदेकर ,अजित कोलेकर, रवींद्र चव्हाण मुली -दीपा तेंडुलकर डॉक्टर सरोज शिंदे, प्रमिला पाटील 21.1 किलोमीटर पुरुष वयोगट 16 ते 30 ऋषिकेश पाटील, शिवतेज पवार, वैभव बेंद्रे 21 किलोमीटर पुरुष 30 ते 45 विजयकुमार करी ,सचिन डकरे, निकेत जोशी महिला- प्रांजली धामणे, आदिती पाटील 21.1 किलोमीटर पुरुष ४५ वयोगटा वरील सुनील शिंदे ,रजनीकांत पाटील, सचिन घाडगे आदी विजयी झाले आहेत.या स्पर्धेसाठी ,प्रशांत काटे,मनीष सूर्यवंशी,अमर धामने,अभिषेक मोहिते,अतुल पवार,संजय चव्हाण,समीर चौगले,मनिष सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी एकूण १५० व्हॅलेंटियर यांनी काम पाहिले.या स्पर्धेसाठी पन्हाळा पोलिसांचे व फोर्ट इंटरनॅशनल स्कूलचे सहकार्य लाभले.
Leave a Reply