
कोल्हापूर: शहरातील नागरिकांना आणि वाहनधारकांना खराब रस्त्याचा प्रचंड त्रास होत आहे . महानगरपालिकेने युद्ध पातळीवर या रस्त्याच्या दर्जेदार दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर करावे . त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही ,अशी ग्वाही काँग्रेसचे कोल्हापूर उत्तरचे आ.चंद्रकात जाधव यांनी दिली .शहरातील खराब झालेल्या रस्त्यांबाबतची आढावा बैठक आमदार चंद्रकांत जाधव यांनी आयुक्त डॉ .मल्लीनाथ कलशेट्टी आणि अधिकाऱ्यांसह व्यापक बैठक घेतली.यावेळी आयुक्तांनी शहरामध्ये सध्या महापालिकेमार्फत सुरु असलेल्या पॅचवर्कच्या कामाची माहिती दिली.तसेच शहरातील मुख्य रस्ते पॅचवर्क करणेसाठी १.६२ लाखाच्या कामाची निविदा १९ तारखेपर्यंत अतिम होऊन लवकरच हि कामे सुरु केली जाणार असलेचे सांगितले. तसेच महापालिकेकडून यावर्षीची मंजूर निधीतील कामेही सुरु करणेबाबत ठेकेदारांना सुचना केलेल्या आहेत असे सांगितले. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेचा टप्पा २ साठी राज्य शासनाकडे १७८ कोटीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. कळंबा येथील साईमंदीर ते नविन वाशीनाका या रिंगरोडच्या डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. आ .जाधव गेली १५ वर्षाहून अधिक काळ डांबर ही न पाहिलेल्या आणि सर्वाधिक अवजड वाहनांची वाहतूक असणाऱ्या उद्योगनगरी शिवाजी उद्यमनगर आणि व्यापारपेठ लक्ष्मीपुरी परिसरातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे .यासह वाय .पी .पोवारनगर या तीनही वसाहतीमधील मुख्य आणि अंतर्गत रस्ते नव्याने करण्यासाठी १७८ कोटीचा प्रस्ताव तयार असून नव्या विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात आपण तो मंजूर करून आणू अशी ग्वाही देत आ.चंद्रकांत जाधव यांनी यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही त्रुटी न राहणारा प्रस्ताव अंतिमरित्या सादर करावा अशी आग्रही सूचना ही दिली. शासनाकडून रस्ते व मुलभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही. ड्रेनेज अथवा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची जी कामे अपुरी आहेत त्याठिकाणचे रस्ते करणेपुर्वी ती पुर्ण करुन घ्या.रस्त्यांची कामे दर्जेदार होणेसाठी संबंधीत कनिष्ठ अभियंता, उपशहर अभियंता यांच्या देखरेखीखाली करा असेही आ. जाधव यांनी सांगितले . यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई , नगरसेवक संभाजी जाधव, कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते .
Leave a Reply