
कोल्हापूर : कोणत्याही बाबतीत काही चुकीचे घडत असले की आंदोलनाचा पवित्रा घ्यायचा हे कोल्हापूरकरांसाठी नेहमीचे झाले आहे. ते कधीही आपल्यावर अन्याय होऊ देत नाहीत. तेवढी कोल्हापूरची जनता अजूनही सुज्ञ आहे. टोलचे आंदोलन असो किंवा शिवाजी पुलाचे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलनाने पाठपुरावा करून कोल्हापूरची जनता यशस्वी झाली आहे. पण या आंदोलनामध्ये ही अनोखे आंदोलन करण्याचा ट्रेंड गेली काही वर्षे कोल्हापुरात सुरू झाला आहे.
खराब रस्त्यांचा प्रश्न सध्या कोल्हापूरकरांसाठी सध्या ऐरणीवर आहे. म्हणूनच याच्यासाठीहि अनोखे आंदोलन करून वाचा फोडण्याचे काम कोल्हापूरकर करत आहेत. काही संघटना व संस्थेच्या मार्फत तुळशीविवाहच्या दुसऱ्या दिवशी खड्ड्यांचे एकमेकांशी लग्न लावून एका वेगळ्या पद्धतीने प्रशासनाला खराब रस्ते दाखवून देण्याचे आंदोलन करण्यात आले.
तर त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त खड्ड्यांमध्ये पणत्या लावून आंदोलन करण्यात आले. प्रशासनाला जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत कोल्हापूरकरांकडे अशा आंदोलन अनोख्या आंदोलनाचे शस्त्र मात्र आहे असे म्हणायला हरकत नाही.
Leave a Reply