
कोल्हापूर:आजपासून केशवराव भोसले नाट्यगृह येथे महाराष्ट्र शासनाच्या ५९ व्या मराठी हौशी नाट्यस्पर्धेस प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभ महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांचे शुभ हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी आणि ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल वेल्हाळ यांचा सन्मान करण्यात आला.
‘थिंक पॉईंट’ या नाटकाने आज स्पर्धेस सुरुवात झाली. नाटय स्पर्धेत एकूण 29 नाटकांचे सादरीकरण होणार आहे. पहिल्याच दिवशी नाटकास रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
Leave a Reply