
मुंबई :लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदती डोंगर येथे श्री रेणुका देवीची यात्रा येत्या डिसेंबर महिन्यात पार पडत आहे. सदर यात्रेकरिता कोल्हापूर व आसपासच्या परिसरातून लाखो भाविक जात असतात. सदच्या यात्रेकरिता गेली ३० वर्षे रेणुका भक्त एस.टी. ने जात आहेत. अलीकडच्या काळामध्ये वाहतुकीच्या नवनवीन सुविधा उपलब्ध असताना देखील सदरच्या यात्रेकरिता एस.टी.ला पसंती दिली जाते. सौंदती यात्रेकरिता शहरातून १६५ एस.टी.गाड्या प्रासंगिक कराराद्वारे बुकिंग केल्या जातात. या गाड्यांच्या खोळंबा आकारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भाविकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम काहींकडून होत होते. परंतु, रेणुका भक्त संघटनेच्या मागणीनंतर यात लक्ष घातले असून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सन २०१५ च्या तुलनेत गेल्या तीन वर्षात श्री रेणुका देवीच्या सौंदती यात्रा भाविकांची रु.३३ लाख ६९ हजार ९६० रुपयांची बचत करण्यात आली होती. गतवर्षी खोळंबा आकार ९० टक्के कमी करण्यात यश आले होते. तर एस.टी.भाडे प्रतिगाडी रु.५० वरून रु.३४ करण्यात आले होते. त्यामुळे सौंदती यात्रेतील एस.टी.भाडे आणि खोळंबा आकारात गतवर्षी प्रमाणे विशेष सवलत द्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर केली. याबाबत एस.टी.महामंडळ सकारात्मक असून, येत्या दोन दिवसात निर्णय घेवून साबंधीताना सुचना देवू, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष रणजीत देवोल यांनी दिली.
Leave a Reply