फिनोपेमेंट्स बँकेची रोकड पुरवठा सेवा लहान शहरांतील ग्राहक व व्यापाऱ्यांना फायदेशीर

 

फिनोपेमेंट्स बँकेने ग्राहकांसाठी कॅश बाजार ही अभिनव रोकड सेवा सुरू केली आहे. लहान शहरे व ग्रामीण भागांत रोख रकमेच्या मागणी व पुरवठ्यामध्ये असणारी तफावत दूर करण्याच्या दृष्टीने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सहजसोपी व सोयीस्कर बँकिंगसेवा देणे या आपल्या तत्त्वज्ञानास अनुसरून फिनोने ही सेवा दाखल केली आहे. या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या जवळच्या मर्चंट बँकिंग पॉइंटचा शोध घेता येईल व त्यातून आपल्या खात्यात पैसे भरणे वा पैसे काढणे हे व्यवहार करता येतील.
बीपे (BPay) या फिनोच्या मोबाइल बँकिंग अॅपच्या साह्याने ग्राहकांना कॅश बाजार ही सुविधा घेता येईल. यासाठी फिनो बँकेचे ग्राहक असणे आवश्यक नसून कोणत्याही बँकेचे ग्राहक हे अॅप डाउनलोड करून ही सेवा घेऊ शकतात.
कॅश बाजार सुविधेच्या लाभांबाबत माहिती देताना फिनोपेमेंट्स बँकेचे प्रमुख उत्पादन अधिकारी मनीष बोरिचा म्हणाले की, “बँकांचेग्राहक व व्यापाऱ्यांना कॅश बाजारच्या माध्यमातून अधिक मूल्यावर्धित सेवा देणे हेआमचे उद्दिष्ट आहे. देशभरात आमच्या बँकेची सव्वा लाख केंद्रे असून त्यातील ८० टक्के केंद्रे ही ग्रामीण भागांत आहेत. स्मार्टफोनचा प्रभावी वापर करणाऱ्या ग्राहकांच्या बँकिंगविषयक सवयी बदलण्याची ताकद या सुविधेमध्ये आहे. याशिवाय, लहानशहरे व ग्रामीण भागांतील रोकड पुरवठा अधिक प्रभावी करणे आणि रोकड बाळगण्यातीलजोखीम कमी करणे हीदेखील यामागील उद्दिष्टे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!