
कोल्हापूर : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज महानिर्वाण दिन. मराठी मनामनात अस्मितेची मशाल प्रज्वलित करणाऱ्या आणि अवघ्या देशात हिंदुत्वाचा वन्ही चेतवणारे एकमेव महानेते म्हणजेच हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे. देशातील जाती गाडून सर्वाना एकत्र करण्याचा राजकीय चमत्कार शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केला. सध्या देशात घडत असलेल्या अनिष्ट घटना, देश विरोधी कारवाया याचा बिमोड करण्यासाठी देशातील नागरिकांना खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांच्या विचाराची गरज आहे. मराठी माणसांचे मानबिंदू, हिंदू जणांचे श्रद्धास्थान, शिवसैनिकांचे सरसेनापती, शिवसेना या महामंत्राचे जनक हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने शिवसेना शहर कार्यालय येथे शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करून समस्त शिवसेना शहर कार्यकारणी, अंगीकृत संघटना आणि शिवसैनिकांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.यावेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, अमित चव्हाण, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, अजित राडे, अजित गायकवाड, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, विभागप्रमुख अश्विनी शेळके, सुरेश कदम, सुनील भोसले, सुशील भांदिगरे, निलेश हंकारे, आदी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply