डॉ. फिक्सिटचे टिकाऊ बांधकामासाठी एक क्रांतीकारी उत्पादन -एलडब्‍ल्‍यू+सुपर

 

कोल्हापूर :बांधकाम उद्योगक्षेत्रामध्ये आलेल्या तेजीमुळे नदीपात्रातील रेतीचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. त्याचबरोबर रेतीसाठी नदीमध्ये चालणा-या खाणकामामुळे नदीपात्राच्या प्रवाहातही असंतुलन निर्माण होत असल्याने भविष्यकाळातील पुराची शक्यताही वाढते. रेतीच्या गगनाला भिडणा-या किंमती आणि वरील सर्व घटकांमुळे मॅन्युफॅक्चर्ड सँड म्हणजे एम सॅँडच्या वापराला उभारी मिळाली आहे. एम-सँडच्या वापरामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.एम-सँडच्या वापरासंबंधीच्या या अडचणी सोडविण्यासाठी बांधकाम आणि वॉटरप्रूफिंगच्या क्षेत्रातील जाणकार मानल्या जाणा-या डॉ. फिक्सिटने एलडब्‍ल्‍यू+ सुपर नावाचे एक क्रांतीकारी उत्पादन बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. एलडब्‍ल्‍यू+ सुपर एम-सँडमध्ये मिसळल्याने तिचा दर्जा वाढतो, ज्यामुळे इमारतीचे आयुर्मान वाढते. काँक्रीटमधील स्टील गंजणे रोखले जाते, इमारतीची बळकटी व टिकाऊपणा वाढतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँक्रिंट आणि रेतीचे मिश्रण वॉटरप्रूफ बनते. याचे प्लास्टरसारखा परिणाम साधणारे गुणधर्म मिश्रणाला एकसंध ठेवतात व त्यातील घटकांना अलग होण्यापासून रोखतात. यामुळे हे मिश्रण पृष्ठभागावर अधिक चांगल्या प्रकारे लिंपले जाते व प्लास्टरमध्ये तुलनेने कमी भेगा पडतात व प्लास्टर करताना ते खाली पडल्याने होणारे नुकसान ५० टक्‍क्‍यांनी कमी होते. हे उत्पादन सिमेंट, काँक्रीट, प्लास्टर्सचे क्युअरिंग झाल्यानंतरची त्यांची अंतर्गत जलरोधकता वाढवते व त्यामुळे इमारतीचे आयुर्मान वाढते. 
 पिडिलाइट इंडस्ट्रीजच्या कन्स्ट्रक्शन केमिकल्स प्रमुख कार्यकारी अधिकारी निलेश मजुमदार म्हणाले, ”कोल्हापूर ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे.यासाठी हे उत्पादन देऊ इच्छितो.पाणी गळणे आणि भिंतीतील ओलाव्याच्या प्रश्नांकडे डॉ.फिक्सिटमध्ये आमच्याकडे योग्य ती उपाययोजना उपलब्ध आहे. ग्राहकांनी नव्या पिढीच्या एलडब्‍ल्‍यू+ सुपर सारख्या योग्य उत्पादनांची निवड करण्याचे तसेच इमारतीचे आयुर्मान वाढविण्यासाठी बांधकामाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच संपूर्ण वॉटपप्रूफिंग करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी पत्रकार परिषदेत ग्राहकांना केले .”  
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!