कोल्हापूर सांगली रस्त्यावर अपघात; तीन युवक ठार

 

कोल्हापूर- कोल्हापूर-सांगली बायपास मार्गावरील जैनापूर (ता.शिरोळ) येथे टेम्पो व मोटारसायकल यांच्यातील भीषण अपघातात झाला. यामध्ये तीन युवक ठार झाले आहेत. एक दानोळी (ता.शिरोळ) येथील तर दोघेजण मजले (ता. हातकणंगले) येथील आहेत. घटनेमुळे दानोळी व मजले गावावर शोककळा पसरली आहे. गुणपाल रोजे (वय 27), सुहास कोठावळे (26, दोघेही रा. मजले, ता. हातकणंगले), अजिंक्य ऊर्फ विपुल रमेश पाटील-रायगोंडा (26, रा. दानोळी) अशी मृतांची नावे आहेत. आज रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला.घटनास्थळावरून मिळालेली अशी कोल्हापूर-सांगली बायपास रस्त्यावरून टेम्पो (एमएच 13 एएक्स 2682) कोल्हापूरच्या दिशेने जात होता. जैनापूर येथे पोल्ट्री फार्मजवळ मोटारसायकल (एमएच 09 डीटी 5624) व टेम्पोची धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती, की मोटारसायकल टेम्पोच्या पुढील भागात घुसली. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गुणपाल रोजे व विपुल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला; तर कोठावळे यांना गंभीर दुखापत झाली. रुग्णवाहिकेतून सांगली येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरले. जैनापूर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जयसिंगपूर प्राथमिक रुग्णालयात विच्छेदनासाठी आणले. तेथे मृतांच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!