गर्ल्स’ डे आऊट 

 

‘गर्ल्स’ डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. ‘गर्ल्स’ डे आऊट नक्की काय? कोणत्या ‘गर्ल्स’? कुठे होता ‘गर्ल्स’ डे आऊट? या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे २९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘गर्ल्स’ चित्रपटातील तिन्ही मुलींनी मुंबईतील एका जबरदस्त ठिकाणी ‘एस्सेल वर्ल्ड’ या अम्युझमेंट पार्कमध्ये अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर, पार्थ भालेराव आणि दिग्दर्शक विशाल देवरुखकर या सर्वांनी त्यांचा ‘डे आऊट’ साजरा केला. 
  ‘गर्ल्स’ सोबत हा ‘डे आऊट’ एन्जॉय करण्यासाठी मराठी मनोरंजन विभागातील अनेक पत्रकारांनी हजेरी लावली होती. ‘एस्सेल वर्ल्ड’ मध्ये प्रवेश केल्यापासूनच सर्वांनीच मजा मस्ती करायला सुरुवात केली होती. पार्कमध्ये असलेल्या सर्व राईड्सचा पुरेपूर आनंद घेत, खेळ खेळत या सर्व ‘गर्ल्स गॅंग’ने धिंगाणा घातला. संपूर्ण दिवस ‘एस्सेल वर्ल्ड’मध्ये घालवल्यानंतर घरी जाताना मात्र सर्वांच्या ओठांवर एकच गाणे होते ‘एस्सेल वर्ल्ड मे रहूँगा मैं, घर नहीं नहीं जाऊंगा मैं’.  ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’, ‘कायरा कुमार क्रिएशन्स’ प्रस्तुत आणि ‘अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शन’च्या अंतर्गत ‘गर्ल्स’ या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. तर चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!