
कोल्हापूर : आधीच कोल्हापूरचे खड्डेपूर झाले आहे. त्यात मागील सोमवारपासून महापालिका आयुक्तांनी पॅचवर्क करण्याचे आदेश दिले. परंतु काही ठिकाणी पॅचवर्क केले आहे. आणि काही ठिकाणी खड्डे तसेच सोडलेले आहेत. या अर्धवट पॅचवर्कमुळे आधी होते ते खड्डेच बरे होते, अशी नाराजी वाहनचालकांतून व्यक्त होत आहे. जिथे खड्डे आहेत तिथे काही ठिकाणी खडी टाकली आहे. सतत वाहनांच्या ये- जामुळे ती खडी पुन्हा रस्त्यावर उखडून बाहेर आलेली आहे. तर काही ठिकाणी मुरूम टाकलेला आहे. त्यावर व्यवस्थित रोलर न फिरवल्यामुळे रस्त्यावर आता खड्ड्यांऐवजी उंचवटे निर्माण झाल्यामुळे वाहन चालवण्यासाठी वाहनचालकांना अजूनच कसरत करावी लागत आहे. लवकरात लवकर संपूर्ण शहरातील रस्ते नवीन करावेत यासाठी रोज नवीन आंदोलने होत आहेत. तसेच आमदार व खासदारांना यांनी एकत्रित येऊन निधी उपलब्ध करून दिला आहे. अशा अर्धवट पॅचवर्कच्या मलमपट्टी पेक्षा नवीन रस्ते करा अशी मागणी आता कोल्हापूरकर करत आहेत.
Leave a Reply