
कोल्हापूर : कोल्हापूरच्या सामाजिक चळवळींत हिरीरीने पुढाकार घेणारे वसंतराव मुळीक यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. मुळीक पंचवीस वर्षे महासंघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाचा कारभार पाहत आहेत.
ते कोल्हापूरच्या विविध चळवळीत सक्रिय राहिले आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू राजांचा वैचारिक वारसा चालविण्याचे काम नेटाने केले आहे. सामाजिक क्षेत्रात काम करताना नव्वद सामाजिक संघटनांना राजर्षी शाहू सलोखा मंचच्या माध्यमातून एकत्र आणून सलोखा घडवला आहे. ते पंचवीस वर्षे मराठा आरक्षणासाठी लढा देत राहिले. कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी झालेल्या मराठा आरक्षण क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक म्हणून काम करताना सूनपूर्ण जिल्हाभर सभा घेऊन ढवळून काढला. त्याच बरोबर मराठा आरक्षणा साठी बेळगाव, नागपूर, मुंबई, इचलकरंजी, सांगली, रत्नागिरी येथील मराठा बांधवांना आरक्षणासाठीचे महत्व सांगत त्यांनी त्यांचे संघटन घडवून आणले व तेथेही मूक मोर्च्यांचे मुख्य समन्वयक म्हणून काम पाहिले. समाजातील अनिष्ट रूढींना छेद देण्याचे काम करताना त्यांनी समाजासाठी आदर्श आचारसंहिता बनविण्याचे काम केले. त्याचबरोबर
राजर्षी शाहू जन्म स्थळ विकसित करण्यासाठी प्रयत्न केले. सीपीआर बचाव कृती समितीच्या माध्यमातून आंदोलने करून दवाखान्यास उर्जितावस्था मिळवून देत, शासनाकडून मिळणाऱ्या औषध साठा वाढविण्यास भाग पाडले. मराठा महासंघाच्या सुमारे अडीचशे शाखांच्या माध्यमातून काम केले. नऊ तालुक्यांत मराठा महासंघाचे संघटन करताना मराठा दाखला, मराठा विध्यार्थ्यांसाठी ५० टक्के स्कॉलरशिप मिळविण्यासाठी आंदोलने केली. सारथी सारख्या संस्थेची संकल्पना मांडून ती अस्तित्वात आणण्यासाठी पाठपुरावा तर केला, शिवाय छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एक लाखांपेक्षा जास्त तैल चित्रांचे वाटप केले. जिल्ह्यातील पुरगस्तान मदतीचा हात म्हणून जवळपास साडे सहा हजार कुटुंबाना मदतीचा हात दिला. गेली जवळपास 17 वर्षे महाराष्ट्र कर्नाटक सिमा प्रश्नांना अग्रभागी राहून वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनात ते सक्रिय असतात.
Leave a Reply