
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शेक्षणिक आणि सांस्कृतिक अशा सर्वांगीण विकासामध्ये शिवाजी विद्यापीठाने मौलिक स्वरुपाचे योगदान दिलेले आहे, असे गौरवोद्गार नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी आज येथे काढले. शिवाजी विद्यापीठाच्या ५७ व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने स्थापनेपासूनच अद्यावत अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य दिले असले, तरी पारंपरिक शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरविले आहे. या क्षेत्राचे भौगोलिक स्थान व महत्त्व लक्षात घेऊन त्याला पूरक व पोषक असे अभ्यासक्रम राबविण्यावर या विद्यापीठाचा भर असल्याचे दिसून येते. आज सर्वत्र इनोव्हेशनचा बोलबाला आहे; तथापि, इनोव्हेशनचे खरे काम शिवाजी विद्यापीठामध्येच होत आहे. राज्यातील अन्य विद्यापीठे कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठाने राबविलेल्या उपक्रमांचे अनुसरण करीत आहेत. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यामुळे राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अशा प्रकारची सकारात्मक देवाणघेवाण सुरू झाली आहे. राज्यातील ज्या विद्यापीठांचे प्रभारी कुलगुरूपद त्यांनी भूषविले, तेथे त्यांनी त्यांचा अमीट ठसा उमटविला, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला
Leave a Reply