
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऍडव्होकेट सूरमंजिरी लाटकर तर उपमहापौरपदी काँग्रेसचे संजय मोहिते विराजमान झाले. सुरमंजिरी लाटकर या कोल्हापूर कोल्हापूरच्या 49 व्या महापौर असून संजय मोहिते हे 45 वे उपमहापौर आहेत. भाजपची ताराराणी आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी यांच्यामध्ये यावेळी चुरशीने मतदान झाले. एक्क्याऐंशी नगरसेवकांपैकी सूरमंजिरी लाटकर यांना 43 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी ताराराणी आघाडीच्या भाग्यश्री शेटके यांना 32 मते मिळाली. ताराराणी आघाडीचे एकूण 33 नगरसेवक आहेत. परंतु तेजस्विनी इंगवले गैरहजर राहिल्यामुळे भाग्यश्री शेटके यांना 32 मते मिळाली. तर उपमहापौर पदासाठी देखील चूरशिने मतदान झाले. संजय मोहिते यांना 43 मते आणि कमलाकर भोपळे यांना 32 मते मिळाली. हात वर करून मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. सर्व नामनिर्देशन पत्र वैध ठरल्याने महापौर पदासाठी दोन आणि उपमहापौर पदासाठी दोन उमेदवार उभे राहिले होते. माघार घेण्यासाठी 15 मिनिटांची वेळ देण्यात आली होती. परंतु कोणीही माघार न घेतल्यामुळे मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान शांततेने मतदान करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.
महापुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांचे काम प्राधान्याने पूर्ण करणार. तसेच शहरात होणारी वाहतूक कोंडी यासाठी ठोस उपाययोजना करणार असल्याचे नूतन महापौरांनी सांगितले.यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
Leave a Reply