
कोल्हापूर: नगारखाना इमारत ही जुना राजवाड्याचे प्रवेशद्वार असून अतिशय भव्य आणि स्थापत्य कलेतील ऊत्कुष्ठ इमारत आहे. या प्रवेशद्वाराने छत्रपतींच्या अनेक राजवटी पाहील्या आहेत. छत्रपतींची स्वारी आल्यावर या प्रवेशद्वारात नगारा व सनई चौघडा वाजवण्याची प्रथा होती. सदरची इमारत तीनमजली असून यामध्ये तिसऱ्या मजल्यावर काळ्या दगडापासून तयार केलेला आरसेमहाल आहे. दर्शनी भागात वेळ दाखवण्यासाठी परदेशी बनावटीचे अतिशय सुरेख असे भव्य घड्याळ बसवण्यात आले आहे. श्री आंबाबाई मंदिराला भेट देणारे भाविक या इमारतीला आवर्जून भेट देत असतात.यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, छत्रपती देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, माजी नगरसेवक विनायक फाळके, संजय पोवार, संभाजीराजे छत्रपतींचे स्वीय सहाय्यक अमर पाटील, धनाजी खोत, सोमनाथ लांबोरे, सुनिल लवंदे, आशुतोष बेडेकर, दिपक सपाटे, उदय घोरपडे, शाहिर तसेच जुना राजवाडा परिसरातील सर्व गाळेधारक व महानगरपालिकेचे पदाधिकारी मोहिमेत सहभागी झाले होते.
Leave a Reply