शिक्षणातून मूल्यवर्धन होणे ही काळाची गरज:भारती कोळी गांधीनगर मध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षण

 

गांधीनगर: आधुनिकतेच्या सध्याच्या जमान्यात माणूस यांत्रिक बनत चालला आहे,मोबाईल मुळे लोकांतील संवाद हरवत चालला आहे, इंटरनेट व स्मार्टफोनच्या युगात शिक्षण हायटेक झालेय परंतु नैतिक मूल्यांची घसरण होत असल्याचे दुर्देवी चित्र समाजात वाढत आहे.त्यामुळे समाजाचा ‘ मार्गदर्शक ‘असलेल्या गुरुजनांनी आता विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा नव्याने नैतिक मूल्यांची यशस्वी रुजवणूक करण्याची जबाबदारी पार पाडावी,शिक्षण प्रक्रियेतून मूल्यवर्धन होणे ही काळाची गरज आहे ” असे मत करवीरचे शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी भारती कोळी यांनी केले.
शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन व राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने गांधीनगर ( ता. करवीर ) येथील साधू वासवानी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गांधीनगर येथे गडमुडशिंगी व गांधीनगर केंद्रातील शिक्षकांच्या तीन दिवसीय मूल्यवर्धन शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत सौ.कोळी बोलत होत्या. केंद्र समन्वयक अनिल कंगणे अध्यक्षस्थानी होते.गटशिक्षणाधिकारी एस के यादव यांच्या माहितीनुसार तालुक्यातील पहिली ते पाचवीला शिकविणाऱ्या एकंदर ८१० शिक्षकांचे प्रशिक्षण दोन टप्यात होणार आहे.केंद्रनिहाय प्रशिक्षणार्थी मध्ये कोपार्डे प्राथमिक शाळा (१२६ ) , शिवाजी हायस्कूल चिखली (९९), ज्ञान विज्ञान हायस्कूल बीड शेड ( १४४), वि. मं. देवाळे(१०६), माऊली हायस्कूल इस्पूर्ली (१०५ ), गांधीनगर हायस्कूल(११३), भारती विद्यापीठ कंदलगाव (११७) . दरम्यान , गांधीनगर केंद्रावर पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाला सुरवात झाली.यावेळी करवीर शिक्षण विभागाच्या विषयतज्ञ ज्योती वेदांते यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.प्रशिक्षणासाठी जोतिबा बामणे,सौ.जयश्री गायकवाड,सौ.दीपा कुंभार यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. केंद्र समन्वयक अनिल कंगणे,दीपाली भोईटे व केंद्रप्रमूख तुकाराम काटे यांनी संयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!