‘गोष्ट एका पैठणीची’ मध्ये झळकणार ‘प्लॅनेट टॅलेंट’चा चेहरा

 
सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी… पदरावरचे मोर, आकर्षक रंगसंगती आणि देखणे काठ ही पैठणीची वैशिष्ट्य… आता हीच पैठणी आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांपुढे येणार आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशीओ फिल्म्सची निर्मिती असलेला आणि शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित ”गोष्ट एका पैठणीची” हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारी आहे. 
सायलीनं आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा या चित्रपटातील तिची भूमिका अतिशय वेगळी आहे. या  चित्रपटात सायलीसह इतर नावाजलेल्या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका असून त्यांची नावे
अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
२४ नोव्हेंबरपासून भोर, पुणे, मुंबई आणि कोकण अशा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकेशन्सवर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. प्लॅनेट मराठीची पहिली निर्मिती असणारा ‘ए बी आणि सी डी’ हा चित्रपट जानेवारी महिन्यात सर्वत्र प्रदर्शित होईल. त्यापाठोपाठ एका अागळ्यावेगळ्या विषयावरच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाची   प्लॅनेट मराठीकडून निर्मिती करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!