
कोल्हापूर: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला क्रमांक १ चा पक्ष म्हणून जनतेने पसंती दिली. त्याचवेळेला महायुती म्हणून सरकार स्थापने संदर्भात जनतेने कौल दिला परंतु शिवसेनेच्या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात गेली एक महिना सरकार स्थापन होत नव्हते. या पार्श्वभूमीवर आज सकाळी महाराष्ट्राचे कर्तुत्ववाण व यशस्वी नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन भाजपाचे सरकार स्थापन करण्याची प्रक्रीया सुरु केली. या सरकार स्थापनेच्या आनंद उत्सव साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, पं.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात विजयी जल्लोष साजरा केला.
Leave a Reply