
कोल्हापूर : शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये 10 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा तीसावा रविवार असून या अभियानामध्ये शहरातील जेष्ठ नागरीक, विविध सामाजिक संस्था, पोलिस कर्मचारी, विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थीनी, नागरिक व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. मोहिम आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी महावीर गार्डन येथे स्वरा फौंडेशनचे कार्यकर्ते व नगारिक यांना स्वच्छतेची शपथ देऊन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यावेळी बोलतांना आज तीसावा रविवार आहे. त्यात सर्वाचाच सहभाग महत्वाचा आहे. दर महिन्यातून एकदा स्वच्छता मोहिमेत सर्वानी सहभागी व्हावे प्लॅस्टिकचा वापर करुनका व इतरानांही करुदेवू नका असे सांगितले.सदरची मोहिम क्रशर चौक ते आपटेनगर, महावीर गार्डन, हुतात्मा गार्डन गोमती नदीची स्वच्छता, जयंती पंपीग स्टेशन संप आणि पंप हाऊस, रिलायन्स मॉल संपुर्ण परिसर, पोलिस लाईन संपूर्ण परिसर, त्याच बरोबर दसरा चौक ते खानविलकर पंप, हॉकी स्टेडियम ते भक्ती पुजा नगर, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी फायर स्टेशन, शिवाजी विद्यापीठ मेनरोड व फुटपाथ, दसरा चौक ते जयंती पंपीग स्टेशन, शाहू नाका ते उड्डान पूल टेंबलाई नाका ते कावळा नाका मुख्य रस्ता या मुख्यरस्तेचीही स्वच्छता करण्यात आली. यामोहिमेत 6 जेसीबी, 8 डंपर, 6 आरसी गाडया व 2 पाणी पुरवठा टँकर, महापालिकेच्या 250 स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी कसबाबावडा झूम प्रकल्प येथील कच-यावर 2 पाण्याचे टँकरणे पाणी मारण्यात आले असून धूराचे प्रमाण कमी झाले आहे
Leave a Reply