
स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ मालिकेत सुरु असणारं नामदेव पर्व लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच आवडत आहे. लहानग्या नाम्याची विठ्ठलभक्ती, चोखामेळ्याला विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी सुरु असणारी त्याची धडपड यामुळे मालिकेत भक्तीचा अनोखा सोहळा पाहायला मिळत आहे.लवकरच या मालिकेत काळाईची एण्ट्री होणार आहे. नाम्याच्या विठ्ठलाप्रती असणाऱ्या भक्तीत खंड पाडण्याचा प्रयत्न काळाई करणार आहे. आपल्या सिद्धीच्या जोरावर ती छोट्या नाम्यावर वर्चस्व गाजवणार आहे. विठ्ठलाचं पंढरीत असणारं प्रस्थ नेस्तनाभुत करण्याच्या हेतुने काळाईने पंढरीत प्रवेश केलाय.काळाईचा हा उद्देश्य सफल होणार की चिमुकल्या नाम्याच्या भक्तीचा विजय होणार याची गोष्ट विठुमाऊलीच्या पुढील भागांमध्ये उलगडणार आहे. इतकंच नाही तर पुंडलिकाच्या निर्वाणानंतर खंडीत झालेली विठ्ठलाची वारी चिमुकला नामदेव सुरु करणार आहे. तेव्हा भक्तीची ही गाथा अनुभवण्यासाठी पाहायला विसरु नका विठुमाऊली सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
Leave a Reply