
कोल्हापूर: टोप संभापुर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील चौदा वर्षीय नववीत शिकणाऱ्या अथर्व गोंधळी वयाच्या सातव्या वर्षापासून सायकल व अन्य खेळाचे धडे त्याची आई ,वडील व तायक्वांदो प्रशिक्षक गजेंद्र हिरवे, शालेय शिक्षक व आयर्नमॅन आकाश कोरगावकर यांच्याकडून घेत आहे.
लहानपणापासूनच खूप जिद्दी आणि मेहनती असलेला अथर्व वयाच्या बाराव्या वर्षी ज्यूदो कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट झाला. आता तो 240 किमीचे अंतर 12 तासात पूर्ण करून जागतिक विश्वविक्रम पूर्ण करणार आहे.अशी माहिती कोरगावकर ट्रस्टचे अध्यक्ष अमोल कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.अथर्वने लहानपणापासूनच विविध खेळामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यश मिळविले आहे. 2018 मध्ये त्याने पाच सुवर्णपदके आणि तीन रौप्य पदक तायक्वांदोमध्ये पटकाविले आहेत. आता त्याचा सायकलिंग मध्ये विश्वविक्रम करण्याचा मानस आहे. लहानपणापासूनच सायकलिंगची आवड अथर्वला आहे. तो शाळेला दररोज दहा किलोमीटर प्रवास आपल्या सायकलवरून सध्या करत आहे यापूर्वी त्याने पन्हाळा ,जोतिबा, कासेगाव ,आष्टा ,शंकेश्वर ,बेळगाव, कराड आदी भागात सायकलचा प्रवास करत “सायकल वापरा शरीर तंदुरुस्त ठेवा, निरोगी रहा, प्रदूषण टाळा, झाडे लावा पर्यावरण वाचवा, असा संदेश देत आपली जिद्द पूर्ण करत मुलांनी एखादी गोष्ट ठरविली तर पूर्ण करतात असा आदर्श घालून देणार आहे.हा प्रवास त्याने नॉन गीअर सायकलवरूनच केला आहे.
पेठवडगाव येथील होली मदर इंग्रजी माध्यम शाळेत शिकणारा अथर्व दररोज 170 किलोमीटर सायकलचा सराव करत आहे. आठवीत असताना त्यांने आपल्या वडीलांकडे गिअर सायकलची मागणी केली होती त्यावेळी त्याच्या वडिलांनी ज्योतिबा डोंगर दहा फेऱ्या मारण्याचे आव्हान त्यांस दिले होते हा खडतर प्रवास त्याने एक महिन्यात पूर्ण करून आपल्या वडिलांकडून गिअरची सायकल मिळावली असल्याचे वडील डॉ. संदीप गोंधळी यांने सांगितले.
या सर्वासाठी अथर्वचे आई-वडील खूप परिश्रम घेत आहेत. आता केवळ विश्वविक्रम करण्याचा माझा मानस असल्याचे अथर्वने बोलून दाखविले.तसेच भविष्यात होणाऱ्या किड्स आयर्न मॅन स्पर्धेत ही तो सहभागी होणार आहे.
30 नोव्हेंबर रोजी होणारा विक्रम हा टोप ते तवंदी घाट व पुन्हा टोप व पुन्हा टोप ते तवंदी घाट व पोलीस अधीक्षक कार्यालय जवळील तिरंगा झेंडा असे दोनशे किलोमीटर अंतर केवळ 12 तासात पूर्ण करणार आहे. या जागतिक विक्रमाची सुरुवात पहाटे 4 वाजता होणार असून सांगता समारंभ 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता तिरंगा झेंडा पोलीस ऑफिस चौक कसबा बावडा कोल्हापूर येथे होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, विश्वविक्रम निरीक्षक मनमोहन रावत, डिजीआय चंद्रशेखर साखरे,व अमोल कोरगावकर,प्रिन्सिबल अनुराधा पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.पत्रकार परिषदेला आयर्नमॅन आकाश कोरगावकर डॉ.मनिषा गोंधळी, श्री. शंकर माळी, अण्णासाहेब माळी, काशिनाथ माळी, श्रीकांत गोंधळी, स्वाती गायकवाड साळुंखे यांची उपस्थिती होती.
Leave a Reply