
कोल्हापूर : टोप संभापुर येथील चौदा वर्षीय नववीत शिकणाऱ्या अथर्व गोंधळीने पर्यावरण वाचवा संदेश देत 296 किलोमीटरचे अंतर 12 तासात पूर्ण करून सायकलिंग मध्ये जागतिक विक्रम केला आहे. अथर्व हा 240 किमीचे अंतर 12 तासात पूर्ण करणार होता मात्र त्याने 240 किलोमीटरचे अंतर 9 तास 45 मिनिटातच पूर्ण केले त्याला 12 तासात विक्रम करायचा होता तर त्याने 12 तासात तब्बल 296 किलोमीटर अंतर सायकल द्वारे पूर्ण करून कोल्हापूरचे नाव उंचावले आहे.हा विक्रम पूर्ण केल्यानंतर त्याने प्रतिक्रिया देताना मी अभ्यासा बरोबर खेळला प्राधान्य देणार आहे आणि भविष्यात स्पोर्टसमन होणार असल्याचे बोलून दाखविले आहे. पहाटे 4 वाजता त्याने या विक्रमास सुरुवात केली होती.कोठेही न थांबता त्याने हा विक्रम पूर्ण केला आहे .टोप ते तवंदी घाट असे तीन वेळा त्याने सायकलिंग केली.सायंकाळी 4 वाजता पोलोस अधीक्षक कार्यालय येथील तिरंगा ध्वज येथे या विक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याचे पोलीस बँड व नातेवाईकांनी जोरदार स्वागत केले.त्याच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.त्याने या विक्रमामध्ये एकूण 6 रेकॉर्ड केले यामध्ये फास्टस सायकलिंग मॅरेथॉन 42.195 किलोमीटर हे रेकॉर्ड त्याला 90 मिनिटात पूर्ण करायचे होते ते त्याने 78 मिनिटात पूर्ण केले यामध्ये त्याने ग्लोबल रेकॉर्ड, चिर्ल्डन रेकॉर्ड,एशिया पॅसिफिक रेकॉर्ड पूर्ण केले तर लॉगेस्ट सायकलिंग रेकॉर्ड मध्ये त्याने 12 तासात 240 चे अंतर पूर्ण करायचे होते ते त्याने 296 किलोमीटर अंतर पूर्ण केले यासाठी त्याला नॅशनल रेकॉर्ड व चिर्ल्डन रेकॉर्ड पारितोषिक त्याला देण्यात आले.पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख ,विश्वविक्रम निरीक्षक मनमोहन रावत, डिजीआय चंद्रशेखर साखरे,व अमोल कोरगावकर,मुख्याध्यापक अनुराधा पाटील ,सौ.मनीषा गोंधळी व संदीप गोंधळी,आयर्नमॅन आकाश कोरगावकर,स्वाती गायकवाड साळुंखे यांच्या उपस्थितीत पारितोषिक देण्यात आले.
Leave a Reply