
कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागाच्या भरती प्रक्रिया २०१७ पासून ‘महापरिक्षा पोर्टल’ माध्यमातून होत आहेत, परंतु महापरिक्षा पोर्टल माध्यमातून आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षामध्ये खूप अनागोंदी कारभार होत असून ,परिक्षार्थींच्या समस्या सोडवण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाही. या सर्वामागे गैरव्यवहार असण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन मागील तीन वर्षांपासून आप युवा आघाडी आणि इतर विद्यार्थी संघटना यांनी महापरिक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी लावून धरली होती.
यासाठी आज आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीने महापरिक्षा पोर्टल बंद करावे या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन दिले.मुळात या ऑनलाइन परीक्षेसाठीसाठी पुरेसे संगणक नसणे,त्यामुळे परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यात घेणे, वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका करणे, काठिण्य पातळी वेगवेगळी असणे, चुकीचे प्रश्न,अनेकवेळा सर्व्हर डाऊन राहते, प्रत्येक परीक्षेवेळी नवीन प्रोफाईल बनवून नव्याने माहिती भरावी लागते,आॅनलाईन परीक्षेसाठी अतिरिक्त फी आकारली जाते,परीक्षा देण्यासाठी अनेकवेळा उमेदवारांना दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागते, वेळेवर सूचना न देणे, लहान व खाजगी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नसणे, अपुरी सुरक्षा,वेळेवर परीक्षा न घेणे, निकाल उशिरा लावणे, डमी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविणे, खासगी संगणक सेंटरमध्ये परीक्षा घेणे, बी.ए.,बी.कॉमचे विद्यार्थी पर्यवेक्षक असणे,अनुपस्थित विद्यार्थ्यांची नावे पात्र उमेदवारांच्या यादीत असणे अश्या अनेक बाबी पुढे आलेल्या आहेत.यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील, आदम शेख, शादाब तहसीलदार आदी उपस्थित होते.
Leave a Reply