
कोल्हापूर: हैदराबाद येथील एका डॉक्टर युवतीवर दुचाकीचे पंक्चर काढण्याच्या बहाण्याने ट्रकचालक, क्लीनर आणि अन्य दोघांनी तिचे रात्री अपहरण करून सामूहिक बलात्कार केला; इतकेच नव्हे, तर तिला जिवंत जाळून तिची निर्घृण हत्याही केली. या प्रकरणामुळे तेलंगाणासह देशभर संतापाची लाट उसळली असून देशभर विविध प्रकारे या घटनेचे पडसाद उमटत आहेत. गेल्या काही वर्षांत भारतात बलात्कार आणि महिलांवर होणारे अत्याचार आता नित्य बनत आहेत. तरी महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी देशात कठोर कायदा लागू करावा, महिलांना विशेष सुरक्षा पुरवावी आणि अत्याचारी नराधमांना शीघ्रतेने अन् कठोरात कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे देण्यात आले.या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, करवीरतालुकाप्रमुख राजू यादव, शिवसेना आणि संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, तालुकाप्रमुख विनोद खोत, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, सर्वश्री संजय कुलकर्णी, विलास कुलकर्णी, बबन हरणे, जयवंत निर्मळ, हिंदु महासभेच्या महिलाआघाडी जिल्हाध्यक्ष सुवर्णा पवार, उपाध्यक्ष रेखा दुधाणे, हिंदुत्वनिष्ठ ज्ञानेश्वर अस्वले, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी उपस्थित होते.
Leave a Reply