
कोल्हापूर: कृषी विश्वातील नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने सतेज कृषी प्रदर्शन येत्या सहा ते नऊ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तपोवन मैदान येथे हे चार दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले असून या प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील,नूतन आमदार ऋतुराज पाटील,महापौर सुरमंजिरी लाटकर, प्रतिमा सोशल वेलफेअर च्या अध्यक्षा प्रतिमा पाटील,उपमहापौर संजय मोहिते या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावा असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. रिलायन्स पॉलिमर आणि संजय घोडावत उद्योग समूह हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. प्रदर्शनात शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, 225 पेक्षाही अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, दोनशेपेक्षा अधिक पशुपक्ष्यांचा सहभाग, शेतीविषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र विविध शेती अवजारे बी-बियाणे, खते, फुलांचे प्रदर्शन व विक्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल असणार आहेत.
Leave a Reply