
कोल्हापूर : रक्तदान,नेत्रदान पाठोपाठ व्यापकप्रमाणात सामाजिक सहभाग वाढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ‘अवयवदान प्रबोधन ‘ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ४ यावेळेत विन्स हॉस्पिटल सभागृह , नागाळा पार्क येथे ही कार्यशाळा सपन्न होणार आहे. शासकिय मान्यताप्राप्त मुंबईतील द फेड्रेशन ऑफ ऑर्गन बॉडी या संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक पुरूषोत्तम पोवार आणि त्यांचे सहकारी पॉवर पॉईंट प्रेजेंटेशनसह तीन सत्रात यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती डॉ. संतोष प्रभु यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. विन्स हॉस्पिटल, साई शक्ती मेडिकल फौंडेशन यांनी याचे आयोजन केले असून कोल्हापूर प्रेस क्लब याचे सहसंयोजक आहेत. गेली वीस वर्षाहून अधिक काळ अवयवदान या क्षेत्रात कार्यरत असलेल्या द फेडरेश ऑफ ऑर्गन बाँडी या संस्थेचे पुरूषोत्तम पोवार हे समर्पित अभ्यासू कार्यकर्ते असून त्यांच्यासह विद्यमान अध्यक्ष हरकचंद साबले हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. यासह गेल्या महिन्यात कोल्हापुरातून आपल्या पत्नीचे अवयवदान करणाऱ्या शहा परिवारांचेही चर्चात्मक अनुभव कथन यावेळी होणार आहे. या कार्यशाळेत डॉक्टर , एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी तसेच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते , परिचारिका, एनजीओ प्रतिनिधी तसेच जेष्ठ नागरिक यांनी सहभागी व्हावे. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र आणि संदर्भ लिखित साहित्य मिळणार आहे. यात सहभागी होण्यासाठी विन्स हॉस्पिटल तसेच साई शक्ती मेडिकल फौंडेशन , तिसरा मजला, मातोश्री प्लाझा व्हिनस कॉर्नर येथे संपर्क साधावा असे आवाहन स्थानिक संयोजक धीरज रोकडे, प्रेस क्लब अध्यक्ष मोहन मेस्री, सचिव मंजित भोसले, राजेंद्र मकोटे यांनी केले.
Leave a Reply