
जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. २०१९ या वर्षांतील शेवटचे खंडग्रास सूर्यग्रहण कोल्हापूरकरांना गुरुवारी दिनांक २६ डिसेंबरला सकाळी ८ वाजून ४ मिनिटांपासून ग्रहणाला सुरवात होणार असून ९ वाजून २३ मिनिटांनी सर्वात जास्त म्हणजे ८४% सूर्याचा पृष्ठभाग झाकला जाणार आहें तर सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी ग्रहण पूर्णपणे संपेल.तसेच कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून आणि सौदी अरेबिया, ओमान, श्रीलंका व इंडोनेशियामध्ये इत्यादी ठिकाणावरून दिसणार आहे. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते. ह्या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे दिसते.या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राच्या वतीने स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेकनॉलॉजि आधिविभागाच्या छतावरून सूर्यग्रहण पाहण्याची व निरीक्षणांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ह्या वेळी शास्त्रीय दृष्ट्या सूर्यग्रहण कसे पाहावे याचे सुद्धा मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करण्यात येइल.तसेच सूर्यग्रहण पाहताना विशिष्ट काळजी खालील प्रमाणे घेण्याचे आव्हान केले आहे. जसे की थेट सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी किंवा दुर्बीण, भिंगे रंगीत किंवा काजळी लावलेले काचेचे तुकडे, एक्स-रे फिल्म, सीडी आणि गॉगल कॅमेरा, मोबाईल किंवा इतर उपकरणं मधून पाहू नका. कारण एकाग्र सौर किरणांमुळे डोळ्यांचे नुकसान होईल आणि डोळ्याला गंभीर दुखापत किंवा कायमचे अंधत्व येऊ शकते असे सांगितले आहे.
Leave a Reply