कोल्हापूर : गडकोट हे आपली अस्मिता असून ती आपल्याला नेहमी शौर्यगाथांची आठवण करून देतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या विशाळगडावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. ही अतिक्रमण आहेत, हे स्पष्ट असतांना ती काढून टाकण्यासाठी पुरातत्व विभाग कोणतीही कृती करण्यास तयार नाही. ही अतिक्रमण काढण्याविषयी विचारणा केल्यावर मनुष्यबळाचा अभाव, तसेच अन्य वेळकाढू कारणे दिली जातात. विशाळगड येथील अतिक्रमणांना प्रशासनाची विशेष सवलत का ? असा परखड प्रश्न ‘लष्कर-ए-हिंद’ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी उपस्थित केला.
आपल्या मार्गदर्शनात श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या परिसरात असलेल्या मनकर्णिका कुंडावरील अतिक्रमण आंदोलन करून, मागणी करूनही काढले जात नाही, हे दुर्दैवी आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरणास काही लोक अकारण विरोध करत आहेत.’’

Leave a Reply