
कोल्हापूर : महाविकास आघाडीचा नुकताच मंत्रीमंडळ विस्तार झाला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला ना. हसन मुश्रीफ, ना. सतेज पाटील, ना. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या रुपानं तीन मंत्रीपदं मिळाली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरात आलेल्या या मंत्र्यांचं आज जल्लोषी मिरवणूकीनं स्वागत करण्यात आले.कोल्हापूर जिल्हा नवीन विकासाची वाट मिळाली आहे. या मंत्र्यांकडून जनतेच्या अपेक्षा आहेत.
छत्रपती ताराराणी चौकात तिन्ही मंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं. पारंपरिक वाद्यांचा गजर, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष आणि पक्षनेत्यांच्या जयघोषासह फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी करत उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं. तिघांनीही छत्रपती ताराराणींच्या पुतळ्याला अभिवादन केलं. खास. संजय मंडलिक, खास. धैर्यशील माने, आम. चंद्रकांत जाधव, डॉ. संजय डी पाटील, आम. ऋतुराज पाटील, महापौर सूरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी खास. निवेदिता माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आम. के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी नगरसेवक राजू लाटकर यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापती, सदस्य, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या नंतर जल्लोषी वातावरणात ताराराणी चौकातून नामदार हसन मुश्रीफ, नामदार सतेज पाटील आणि नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मिरवणूकीला सुरुवात झाली.
Leave a Reply