
कोल्हापूर : महाराष्ट्रातील वीस जिल्ह्याचा समावेश असलेल्या विश्व हिंद परिषदेच्या पश्चिम प्रांतिय दोन दिवसाच्या बैठकीचे आयोजन ऐतिहासिक पन्हाळगडावर करण्यात आले आहे.दिनांक ११ आणि १२ जानेवारी रोजी ही व्यापक बैठक होत असून यामध्ये केंद्र आणि राज्य स्तरावरील विश्व हिंदू परिषद – बजरंग दल – मातृशक्ती पदाधिकारी विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद मुजुमदार, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.जगातील ८०हुन अधिक देशात कार्यरत असलेल्या आणि सेवा, संस्कार, सुरक्षा या बळावर कार्यरत भारतीय मूल्यांची जपणूक करणाऱ्या विश्व हिंद परिषदेच्या गो सेवा संस्कार शाळा सत्संगसह विविध १८ सेवा कार्याच्या पैलूवर या दोन दिवसाच्या बैठकीत व्यापक चर्चा आणि प्रबोधन होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात गाव, तालुका पातळीपर्यंत विश्व हिंदू परिषदेच्या विविध संलग्र संस्थाचा विस्तार करणे यावरही या परिषदेत सूक्ष्म नियोजनासह व्यापक चर्चा होणार आहे. तीनशेहून आधिक निमंत्रित यामध्ये सहभागी होऊन विचार मंथन करणार आहेत. या बैठकीचा जाहीर समारोप पन्हाळगडावरील छत्रपती शिवरायांच्या मंदिर परिसरात रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या दोन दिवसाच्या बैठकीच्या नियोजनासाठी गेली महिनाभर जिल्हासह मंत्री विक्रम बोधे,जिल्हा बजरंग दलाचे सुरेश रोकडे यांच्यासह शंभरहुन अधिक कार्यकर्ते याचे नियोजन करत आहेत.
Leave a Reply