
पुणे: पुण्यातील साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे डॉ. नीरज आडकर यांनी जिकेएस बटरफ्लाय तंत्रज्ञान वापरून महाराष्ट्रात प्रथमच गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. ग्लोबल नी सिस्टीम- बटरफ्लाय ही तीन भाग असलेली प्रणाली आहे. जी गुडघ्यामधील सर्व प्रकारच्या हालचालींना स्थिरता प्रदान करते.६५ वर्षीय अधिकराव साळुंखे यांचा २०१२ मध्ये कराड येथे अपघात झाला.अपघातामुळे त्यांना गुडघ्याला फ्रॅक्चर झाले होते. परिणामी त्यांना शस्त्रक्रिया देखील करावी लागली होती. परंतु शस्त्रक्रिया करून देखील त्यांना त्रास होत होता.अनेक ठिकाणी उपचार करून देखील त्यांचा त्रास कमी झाला नाही, शेवटी त्यांनी २०१८ मध्ये पुण्यातील साईश्री हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथील डॉ. नीरज आडकर यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. डॉ.नीरज आडकर यांच्या असे लक्षात आले की, त्यांना ऑस्टियोआर्थरायटिस आहे त्यामुळे त्यांनी साळुंखे यांची २०१८ साली बायलॅटरल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया केल्यांनतर एक वर्षानंतर ही साळुंखे यांचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे ते पुन्हा साईश्री हॉस्पिटल येथे गेले असता डॉक्टरांच्या असे लक्षात आले की, साळुंखे यांच्या उजव्या गुडघ्यात संसर्ग होऊ लागल्यामुळे त्यांच्या गुडघ्यातील संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण काढावे लागणार आहे. पूर्वी झालेली शस्त्रक्रिया लक्षात घेता साळुंखे यांचे इम्प्लांट फिक्सेशन काढण्यात आले. तेव्हा साळुंखे यांच्यावर अँटीबायोटिक स्पेसरचा वापर करून संसर्ग पूर्णपणे मिटविला गेला आणि त्यांची जिकेएस बटरफ्लाय टेक्नीक वापरून टोटल नी रिप्लेसमेंट करण्यात आली.जिकेएस बटरफ्लाय प्रणालीची सकारात्मक वैशिष्ट्ये बघता यामध्ये दोन रोटेशन ऍक्सिस आहेत ज्यामध्ये सखोल असे ट्रॉक्लियर ग्रूव्ह आहेत जे ऑप्टिमल पॅरलल ट्रेकिंग,असिमेट्रिकल टिबिअल आर्टिक्युलेटिंग पृष्ठभागाचा असमानमित आकार असल्याने समतोलास मदत होते.जे नैसर्गिक गुडघा आणि रुग्णाच्या नैसर्गिक रचनांचे अनुकरण करणारे डायनॅमिक, डायनॅमिक आणि ट्रायडिओलॉजिकल फंक्सेस सुलभ करते.यावेळी बोलताना डॉ. नीरज आडकर म्हणाले की,साळुंखे यांचा शस्त्रक्रियेचा इतिहास पाहता मी आणि माझ्या टीमने त्यांची बटरफ्लाय टेक्निक वापरून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
Leave a Reply