
कोल्हापूर : आयआयएफएल फायनान्सही भारतातील एक सर्वात मोठी नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीआपल्या शाखांमध्ये आयआयएफएल फौंडेशनच्या सहयोगाने,“मिलन”अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करते.हे उपक्रम लोकांवर सकारात्मक परिणाम करतात आणि स्थानिक समुदायाचे व समाजाचे ऋण फेडण्यासाठीआयआयएफएलने हाती घेतलेल्या मिशनचा भाग आहेत.
आयआयएफएलमध्ये, कुटुंबाने आर्थिक भवितव्याच्या दृष्टीने तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे, कुटुंबाला काय साध्य करायचे आहे, यावर भर देण्यास मदत होते असे आमचे मत आहे. या मिशनच्या पूर्ततेसाठीआयआयएफएल फायनान्सने 21 डिसेंबर 2019 रोजी देशातील 900 हून अधिक शहरांत एकाच दिवशी1,100 हून अधिक आयआयएफएलशाखांमध्ये “फ्युचर का गणित” कार्यशाळांचे आयोजन केले.आर्थिक नियोजन हे केवळ बचत करण्यापुरते मर्यादित नसून त्यामध्ये पैशांच्या काळजीपूर्वक व्यवस्थापनाचा आणि विविध वाढ व करबचत करणाऱ्या साधनांमधील गुंतवणुकीचाही समावेश होतो, हेया कार्यक्रमांमध्ये स्पष्ट केले जाते.गोल्ड लोन्सचे प्रमुख सौरभ कुमार यांनी सांगितले,“आयआयएफएल फायनान्स ही एक जबाबदार कंपनी असून, तिच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये ईएसजी, म्हणजे एन्व्हॉयर्नमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स, उद्दिष्टांचा समावेश आहे. “फ्युचर का गणित”द्वारे आम्ही कुटुंबांना त्यांची आर्थिक उद्दिष्ट्ये ठरवण्यासाठी आणि ती साध्य करण्याच्या दृष्टीने काम करण्यासाठी मार्गदर्शन केले.तसेच देशभरातल्या आयआयएफएल फायनान्सच्या 1700+शाखांमध्ये कोणालाही जाता येऊ शकते आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक भवितव्याच्या दृष्टीने मोफत सल्ला घेता येऊ शकतो.“मिलन” या सीएसआर कार्यक्रमाद्वारे,आयआयएफएल फायनान्सने आरोग्य, पर्यावरणाचे संवर्धन व आर्थिक साक्षरता यांच्याशी संबंधित नावीन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करून आतापर्यंत 4 लाखांहून अधिक जणांना लाभ दिला आहे.
Leave a Reply