अर्बिट्रेज फंडासह स्वार व्हा लघुकालीन अस्थिरतेवर

 

बाजारपेठेतील उच्च अस्थिरता लक्षात घेता अर्बिट्रेज प्रकारच्या फंडात गुंतवणुकदारांना नव्याने रस निर्माण झाला आहे. गुंतवणुकदार त्यांची लघुकालीन अतिरिक्त रक्कम साठवण्यासाठी आणि कमीत कमी जोखमीसह भांडवलवृद्धी करण्यासाठी, ठराविक कालावधीनंतर उत्पन्न मिळवण्यासाठी व कर अर्बिट्रेजसाठी अर्बिट्रेज फंडाचा वापर करतात. पूर्णपणे हेज्ड इक्विटी पोर्टफोलिओ अधिक चांगल्या अर्बिट्रेज संधींच्या शोधात असतो आणि तो कोणत्याही दिशात्मक इक्विटी कॉल्सची जोखीम दूर ठेवतो. युटीआय अर्बिट्रेज फंड हा अर्बिट्रेज फंडाच्या 2006 मध्ये लाँच करण्यात आलेल्या सुरुवातीच्या पिढ्यांपैकी एक आहे आणि आता वेगवेगळ्या बाजारपेठ परिस्थितीच्या चक्रातून जाण्याचा 13 वर्षांचा इतिहास त्याला लाभलेला आहे. फंडाने समाधानकारक कामगिरी केली आहेच, शिवाय आपल्या नियमित आणि थेट योजनांअंतर्गत मासिक लाभांशही दिला आहे. फंडाने आपल्या रेग्युलर- ग्रोथ पर्यायाअंतर्गत (माहितीचा कालावधी – डिसेंबर 2014 ते डिसेंबर 2019) सहा महिने दैनंदिन पातळीवर 6.43 टक्क्यांचा सरासरी परतावा (रोलिंग परतावा) दिला आहे. याच कालावधीत फंडाने सहा महिने दैनंदिन रोलिंग बेसिसवर कोणत्याही नकारात्मक परताव्यांशिवाय 4.95 टक्के (किमान) ते 9.37 टक्क्यांच्या श्रेणीत परतावे दिले आहेत. एकत्रित वार्षिक वाढीच्या बेसिसवर फंडाने आपल्या नियमित योजनेअंतर्गत 6.17 टक्क्यांचा परतावा दिला आहे, तर एका वर्षाच्या बेसिसवर थेट योजनेअंतर्गत 6.68 टक्क्यांचा परतावा दिला आहे. हा फंड इक्विटीवर भर देणारा असल्यामुळे इतर डेट गुंतवणुकीच्या तुलनेत त्याला कराच्या विशिष्ट अर्बिट्रेजचा (भांडवल लाभ कर आणि लाभांश वितरणाच्या बाबतीत) लाभ मिळतो. फंडाने यापूर्वी सातत्यपूर्ण मासिक लाभांश वितरण केले आहे. लाभांशाच्या रुपातील नियमित उत्पन्न गुंतवणुकदारांना त्यांचे उत्पन्न समग्र पद्धतीने गुंतवण्यास मदत करते. त्याशिवाय एनएव्ही वृद्धीमुळे एकंदरीत परताव्यात भर पडते.बाजारपेठेतील सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजेच क्रेडिटच्या समस्या आणि अस्थिरतेमुळे उच्च जोखीम असताना अर्बिट्रेज फंड फंडाच्या लघुकालीन साठवणुकीसाठी तुलनेने जास्त सुरक्षित गुंतवणूक पर्याय पुरवू शकतात. पूर्णपणे हेज्ड इक्विटी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांची चिंता कमी करतो आणि अर्बिट्रेज संधींकडून उच्च उत्पन्न मिळतो. डेटच्या बाबतीत फंड व्यवस्थापक 175-200 दिवसांच्या दर्जेदार डेट इन्स्ट्रुमेंट्सवर (उदा एएए, ए1+) भर देऊ शकतो. युटीआय अर्बिट्रेज फंडाचा इतिहास लक्षात घेता, तो गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. विशेष म्हणजे, या फंडाने डिसेंबर 2018 मध्ये 1275 कोटी रुपयांच्या एयूएमवरून 31 डिसेंबर 2019 मध्ये 3309 कोटी रुपयांवर झेप घेत लक्षणीय प्रगती दाखवून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!