
सुरेश खातनहार यांनी आयडीबीआय बँकेचे पुढील 3 वर्षे कालावधीसाठी उप व्यवस्थापकीय संचालक म्हणून जानेवारी 15, 2020 रोजी पदभार स्वीकारला आहे. डीएमडी होण्यापूर्वी ते आयडीबीआय बँकेचे कार्यकारी संचालक या पदी कार्यरत होते आणि मिड कॉर्पोरेट ग्रुप व ट्रेड फायनान्सचे नेतृत्व करत होते. गेली 22 वर्षे ते आयडीबीआय बँकेसोबत काम करत आहेत आणि कमर्शिअल बँकिंगच्या विविध पैलूंचे व्यवस्थापन करत आहेत. 1997 मध्ये आयडीबीआय बँकेमध्ये येण्यापूर्वी ते देना बँकेमध्ये कार्यरत होते.
सुरेश खातनहार यांनी मुंबई विद्यापीठातून मास्टर्स ऑफ कॉमर्स (एम. कॉम) ही पदवी घेतली आहे, तसेच ते इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ऑफ इंडिया (एआयसीडब्लूए) येथून सर्टिफाइड असोसिएट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सचे (सीएआयआयबी) सर्टिफाइड असोसिएट आहेत.
एकूण 35 वर्षे अनुभव असणाऱ्या सुरेश खातनहार यांचा पोर्टफोलिओ कमर्शिअल बँकिंग क्षेत्रातील अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. त्यामध्ये रिटेल बँकिंग बिझनेस, प्रायॉरिटी सेक्टर लेंडिंग, कॉर्पोरेट बँकिंग (मिड कॉर्पोरेट व लार्ज कॉर्पोरेट), सेवा-प्रणित कार्ये – ट्रेड फायनान्स, रिस्क मॅनेजमेंट, ऑडिट मॅनेजमेंट, कम्प्लायन्स, क्रेडिट मॅनेजमेंट व मॉनिटरिंग, आणि कमर्शिअल बँकिंगच्या अन्य पैलूंचा समावेश आहे.
Leave a Reply