
कोल्हापूर : फेथ फौंडेशन या एनजीओ मार्फत आम्ही भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सैनिक या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार आणि त्यांच्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रंकाळा पदपथ येथे सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये भारत देशासाठी विविध लढ्यामध्ये लढताना शहीद झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर बी डोगरा यांच्या हस्ते आणि ले.कर्नल संजीव सरनाईक,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आम.ऋतुराज पाटील,आम.चंद्रकांत जाधव तसेच सैन्य दलातील माजी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये वीरमाता वीरपत्नी यांना सन्मानित करून त्यांच्या देशसेवेकरिता कुटुंबातील सदस्यांच्या केलेल्या त्यागाबद्दल आदर व्यक्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजक राज कोरगावकर यांनी सांगितले आहे.
सत्कारमूर्ती मध्ये श्रीमती केरु पाटील, श्रीमती पार्वती कारंडे, सौ.सुभद्रा पाटील,श्रीमती शांता चिले, श्रीमती छाया पाटील, श्रीमती कुसुम बिरंजे, श्रीमती मालुबाई मगदूम, श्रीमती शैलजा केळकर, श्रीमती हौसाबाई चौगुले, श्रीमती कांचनदेवी भोसले, श्रीमती आनंदी उलपे ,श्रीमती मनिषा सूर्यवांशी, श्रीमती प्रतिभा भाट, अजित सिह शिंदे,श्रीमती सुनिता देसाई, श्रीमती अंबाबाई पाटील, श्रीमती मालती देवी चेचर,श्रीमती शांता जाधव,श्रीमती जयश्री चौगुले, श्रीमती महादेवी रेडेकर,श्रीमती छाया पाटील,पूजा एकल श्रीमती सुलोचना पाटील,अनुसया भोसले,श्रीमती छाया इंगळे, श्रीमती वासंती वेताळे ,श्री शिवाजी पाटील ,श्रीमती राजश्री मान, श्रीमती अश्विनी पाटील, सोनाबाई लाडेगावकर या वीर पत्नी यांचा समावेश आह.
देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट असते.सैन्य दलात भरती होणारे जवान देशासाठी लढताना शहीद होतात देशासाठी कुटुंबातील व्यक्ती यांचा त्याग करणे ही मोठी बाब आहे. आणि म्हणूनच त्यांच्या कुटुंबीयांचा यासाठी त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध गायक कबीर आणि त्यांचे सहकारी शहीद कुटुंबियांसाठी देशभक्तीपर गीते सादर करणार आहेत तसेच कोल्हापुरात आलेल्या महापुरात लोकांच्या मदतीसाठी धावून आलेल्या एनसीसीचे कँडीटसचा सन्मान करण्यात येणार आहे व ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर बी डोगरा यांचे देश भक्तीपर व्याख्यान होणार आहे.
Leave a Reply