
ज्युनियर चेंजमेकर’ कार्यक्रम हा ‘लेट्स ऑल हेल्प’ या संस्थेचा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी मुलांसाठी राबवलेला हा उपक्रम आहे. समाजातल्या तळागाळातील लोकांना भूकमुक्त करून त्यांच्यापर्यंत चांगले आरोग्य आणि स्वच्छता हा मूलभूत अधिकार पोहचवण्याचे ध्येय बाळगून ‘लेट्स ऑल हेल्प’ ही संस्था त्या दृष्टीने काम करते आहे. शाळेतील मुले,महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यापाठातले युवक यांच्यात,समाजातल्या तळागाळातील मुलांना मदत करून त्यांना मुख्य प्रवाहात आणत त्यांचे भविष्य घडवण्याची जी उत्स्फूर्त इच्छा वेळोवेळी दिसते,त्याचा सुयोग्य वापर संस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे. किंबहुना या उत्स्फूर्त इच्छेमुळेच हा ‘मुलांसाठी मुलांनी’ स्वरूपाचा कार्यक्रम राबवण्याची प्रेरणा संस्थेला मिळाली आहे.’ज्युनियर चेंजमेकर’ म्हणून मुले आणि युवक १० ते १०० वंचित मुलांना मासिक अन्न तसेच वैयक्तिक स्वच्छतेच्या साधन सामुग्रीची किट्स उपलब्ध करूंन देतील. ‘लेट्स ऑल हेल्प’ या संस्थेच्या माध्यमातून सधन कुटुंब,मित्रमैत्रिणी आणि दानशूर व्यक्तींना भेटून हा उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करतील.
ईमेल आणि सोशल मिडिया अकांऊट असलेली मुले किंवा त्यांचे पालक ‘ज्युनियर चेंज मेकर’ म्हणून नोंदणी करू शकतात. प्रत्येक ज्युनियर चेंजमेकर’ला देण्यात आलेली देणगी हि संपूर्णपणे १००% वंचित मुलांनाच दिली जाईल.ईमेल आणि सोशल मिडिया अकांऊट असलेली मुले किंवा त्यांचे पालक ‘ज्युनियर चेंज मेकर’ म्हणून नोंदणी करू शकतात. प्रत्येक ज्युनियर चेंजमेकर’ला देण्यात आलेली देणगी हि संपूर्णपणे १००% वंचित मुलांनाच दिली जाईल. फेसबुक,इंस्टाग्राम,ट्विटर खात्यांच्या मार्फ़त हा उपक्रम राबवला जाणार असून त्यामुळे या उपक्रमाला युवा वर्गाचे व्यापक पाठबळ मिळेल.हा ऑनलाईन पद्धतीने राबवला जाणारा अनोखा उपक्रम असून ‘ज्युनियर चेंजमेकर’ ही संकल्पना सध्याच्या ऑनलाईन पिढीत सामाजिक भान निर्माण करणारी आहेच पण बरोबरीने वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणणारा महत्वाचा उपक्रम आहे. या संदर्भात अधिक माहिती संस्थेच्या letsallhelp.org, या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
Leave a Reply